राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ पूर्णांक ६९ शतांश टक्के झाले आहे.


काल दिवसभरात आणखी ५ हजार ९०२ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ६६ हजार ६६८ झाली आहे. काल १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक लाख २७ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


रायगड जिल्ह्यात काल २२८ तर आतापर्यंत ५० हजार ८०० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल १२५ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णाची संख्या आता ५३ हजार ७१२ झाली आहे. काल ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


बुलडाणा जिल्ह्यात काल ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ८ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल १२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९ हजार ३०३ झाली आहे. आतापर्यंत १२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


परभणी जिल्ह्यात काल ते ३० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. आतापर्यंत ६ हजार ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, एकूण बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ५११ झाली आहे. जिल्ह्यात या आजाराने २६३ रुग्णांचा बळी घेतला आहे. सध्या १९९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.


अहमदनगर जिल्ह्यात काल २८८ तर आतापर्यंत ५३ हजार ५७९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल २६५ रूग्णांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५ हजार ९०० वर पोचली आहे. आतापर्यंत ८५९ रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत. सध्या १ हजार ४६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यात काल २९ तर आतापर्यंत ७ हजार ८२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढून ८ हजार ४३० झाला आहे. सध्या १८६ रुग्ण उपचाराधीन आहेत.


सातारा जिल्ह्यात काल २७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४१ हजार ४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातली रुग्णांची संख्या ४६ हजार २३ झाली आहे. आतापर्यंत १ हजार ५२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या ३ हजार ४४८ रुग्ण उपचार घेत आहेत.


नांदेड जिल्ह्यात काल १०१, तर आतापर्यंत १७ हजार ७१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ७१ बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या १९ हजार २७ झाली आहे. सध्या ६६९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.