ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यांकडून उरण इथल्या गॅस थर्मल पॉवर स्टेशनची पाहणी


मुंबई (वृत्तसंस्था) : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण इथल्या गॅस थर्मल पॉवर स्टेशनची आज पाहणी केली. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं वायू विद्युत केंद्रातल्या अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी बोकडविरा प्रकल्पातल्या पॉवर स्टेशनची पाहणी केली.


प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाची माहिती देत तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्राबाबत सादरीकरण केले. यावेळी सातत्याने खंडित होणारी वीज आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळण्यासंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना स्थानिक गावकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले.


येत्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यातल्या उरण ऊर्जा प्रकल्पाची क्षमता एक हजार मेगावॅटने वाढवण्याची घोषणा कालच ऊर्जामंत्र्यांनी केली होती. ग्रीड बंद पडल्यामुळे मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.