मनसेच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राजभवनात भेट घेतली


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची आज राजभवनात भेट घेतली.

वाढीव विज देयकं, तसंच दूध दरवाढ, मंदिर प्रवेश, अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांचे प्रश्र्न तातडीनं सोडवले जावेत, यासाठी ही भेट घेतल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

या मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.