आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिकॅम ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं बीजभाषण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ग्रँड चॅलेंजेस ऍन्युअल मीटिंग, जी-कॅम-२०२० च्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. जी-कॅमनं गेली 15 वर्ष आरोग्य आणि विकास प्रक्रियेतली आव्हानं हाताळणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहयोगी संस्थांना प्रोत्साहन दिलं आहे.


जी-कॅम-२०२० मध्ये सुमारे ४० देशांमधले धोरणकर्ते आणि विज्ञानवादी मिळून सोळाशेजण सहभागी होणार आहेत. ही वार्षिक सभा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तीन दिवस चालणार आहे.

या सभेत, कोविड-१९, 'इंडिया फॉर द वर्ल्ड' या विषयावर विशेष भर दिला जाईल, याशिवाय भाषणं, चर्चासत्रं आणि विविध विषयांवर माहितीची देवाण-घेवाण होणार आहे. हा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नीती आयोग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्यासह बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि अन्य आंतर्राष्ट्रीय संस्था आयोजित करत आहेत.