वार्षिक उपवासाच्या काळात जैन मंदिरांशी निगडित भोजनगृह खुली ठेवायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगीमुंबई (वृत्तसंस्था) : जैन समुदायाच्या आयम्बील ओली तप या नऊ दिवसांच्या वार्षिक उपवासाच्या काळात जैन मंदिरांशी निगडित भोजनगृह दिवसातून पाच तास खुली ठेवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.  या भोजनगृहांचं क्षेत्रफळ एक हजार चौरस फूट अथवा त्यापेक्षा जास्त असावं, तसंच दर दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळात तासाला केवळ  ४०, तर पाच तासांमध्ये २०० व्यक्तींसाठी ही भोजनगृह खुली ठेवता येतील, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.