उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागणनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल ट्विट करत त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली. 


आपल्याला कोरोनाची विशेष लक्षणे नसल्यामुळे दक्षता म्हणून पुढील काही दिवस आयसोलेट राहून टेलिफोन आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्काद्वारे आपण कामकाज चालू ठेऊ त्यामुळे आरबीआयच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा  कोरोनाग्रस्त झाले आहेत. आपली तब्येत ठीक असल्याचं त्यांनी ट्वीटरवर सांगितलं. ते दक्षिण मुंबईतल्या खाजगी रूग्णालयात दाखल आहेत.