पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केवडीया येथील आरोग्य वनाचे लोकार्पण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच गुजरातमधील केवडीया इथे उभारण्यात आलेल्या आरोग्य वनाचे लोकार्पण करण्यात आले.


१५ एकरवरील या वनात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. मोदी यांनी या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते आरोग्य कुटीर, जंगल सफारी, एकता मॉल आदीं प्रकल्पांचेही उदघाटन झाले. अनेक विकास कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले असून, आज सकाळी अहमदाबाद इथे पोहोचल्यानंतर त्यांनी गांधीनगर इथे दिवंगत माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. काल केशुभाई पटेल यांचे निधन झाले. मोदी यांनी दिवंगत महेश आणि नरेश कनोडिया या बंधूंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले.