नितीन गडकरींच्या हस्ते उद्या आसाममध्ये देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी


नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी उद्या देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची आसाममध्ये आभासी पद्धतीने पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जनरल (सेवानिवृत्त) डॉ. व्ही के सिंग आणि रामेश्वर तेली, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.


693.97 कोटी रुपयांचा हा प्रकल्प लोकांना हवाई, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देणार आहे. केंद्र  सरकारच्या महत्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत हे मल्टी-मोडल पार्क विकसित केले जाईल.