बेकायदा कृत्यांविरोधी नव्या कायद्याअंतर्गत १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयाने काल बेकायदा कृत्यविरोधी कायद्याअंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे.

२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर-ए-तोयबाचा युसूफ मुजम्मील, लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की, तसेच १९९९ मधील कंधार आयसी-८१४ विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकळ बंधूंना देखील दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

या यादीत दाऊद इब्राहीमच्या काही सहकाऱ्यांची नावे आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षीय यूएपीए कायद्यात बदल केला होता. या बदलाआधी केवळ संघटनेलाच दहशतवदी संघटना म्हणून घोषित करता येत होते. आता व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून घोषित केले जाऊ शकते.