उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार


नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते.


आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी श्रीमती उषा नायडू यांची केलेली कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे.  


उपराष्ट्रपती नायडू यांची तब्येत चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लवकरच दैनंदिन कार्य सुरु करतील. आरोग्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.