देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.

देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली आला आहे.देशभरात सध्या ६ लाख ५३ हजार ७१७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशभरात काल दिवसभरात ९ लाख ३९ हजार ३०९ कोरोना चाचण्या झाल्या अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आयसीएमआरनं दिली आहे.

देशात आतापर्यंत एकूण १० कोटी ३४ लाख ६२ हजार ७७८ चाचण्या झाल्यालंची आयएसीएमआरनं कळवलं आहे.