संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ३ दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना,


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले. ३ ते ५ सप्टेंबर या कालवधीत रशियाचे संरक्षणमंत्री शेर्गेई शोइगु यांच्या आमंत्रणावरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात ते दुसऱ्या महायुद्धातील विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  शांघाय सहकार्य संघटना, सामुहिक सुरक्षा करार संघटना आणि कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेटसच्या  सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्याच्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राजनाथसिंह त्यांचे रशियाचे समपदस्थ शोइगु यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य आणि इतर सामायिक मुद्द्यांवर चर्चाही करणार   आहेत.