कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक


मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी २५ लाख ४४ हजार ६६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १६ सप्टेंबर या कालावधीत


पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३५६ (८९४ व्यक्ती ताब्यात)


१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ०४४


अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७


जप्त केलेली वाहने – ९६,१६०


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १८७ पोलीस व २१ अधिकारी अशा एकूण २०८ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.


पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.


कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image