ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली मलठणवाशियांच्या तक्रारीची तात्काळ दखल


पुणे : दोन दिवसांपूर्वी वादळी पावसात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मलठण गावातील 100  /22 केव्हीए गावठाण रोहित्रावर वीज पडल्याने तो नादुरूस्त झाला होता. यामुळे या रोहित्रावरील घरगुती आणि शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे हे रोहित्र बसवून देण्यासाठी गावकऱ्यांनी 11 सप्टेंबर रोजी विनंती केली होती. याची ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तात्काळ दखल घेऊन बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना हे रोहित्र तात्काळ बदलून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हे रोहित्र बदलून 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत केला. 


ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत केलेल्या तात्काळ कार्यवाही बाबत मलठन गावातील गावकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्यांचे आभार मानले आहेत. 


ग्राहकांचे समाधान हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ऊर्जा विभाग ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात सजग झाला असून ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.