मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मध्ये कोविड -१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतल्या प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखता यावं यासाठी मध्य रेल्वेनं उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करायचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सध्याच्या ३५५ गाड्यांबरोबर ६८ अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत अशी माहिती आज मध्य रेल्वेनं  दिली. पश्चिम रेल्वेनं याआधीच आपल्या उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्यामध्ये साडेतीनशे वरून पाचशे पर्यां वाढ केली आहे.