शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर स्थानकावरुन न निघता, दिल्लीहून नांदेडकडे परत येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.