डॉ. मिलिंद संपगावकर यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड


पुणे : भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीची प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. प्रदेश संयोजक श्री प्रदीप पेशकार आणि प्रभारी माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योग आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची घोषणा केली आहे. डॉ. मिलिंद संपगावकर यांची यामध्ये सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.


डॉ. मिलिंद संपगावकर म्हणाले कि, मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करीत असताना भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष्याने माझ्या क्षेत्रात काम करण्यासाठी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी व पक्षनेतृत्वाने ठेवलेला विश्वास सार्थ करण्यास मी कटिबद्ध असेल. अनेक बुद्धीवंतांचा व कर्तृत्व असणाऱ्यांचा पक्ष अशी भारतीय जनता पक्षाची ख्याती असून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष नेहमीच संघटना व संघटनात्मक बांधणीसाठी त्याचा उपयोग करीत असतो याचे एक ज्वलंत उदाहरण हे माझ्या नेमणूक दिसून येते. माझी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी कार्यकारणी सदस्य पदी तसेच सेवा उद्योग प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी नेमणूक केल्याबद्दल मी मा.विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, मा. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेश संयोजक प्रदीपजी पेशकार, व प्रभारी मा. चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे खासदार मा. गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमदार प्रा. देवयानी सुहास फरांदे, भारतीय जनता पार्टी प्रदेश महासचिव श्रीकांतजी भारतीय, आमदार मुक्ता शैलेश टिळक व सर्व हितचिंतकांचे आभार व कायम ऋणी राहणार असल्याचे डॉ. संपगावकर म्हणाले.


महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार म्हणाले कि, आपल्या कर्तुत्वाच्या योगदानामुळेच महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. तसेच आपल्या कार्याचा विचार करता महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या भाजपा (उद्योग) व्यवसाय आघाडीच्या “सदस्य व सेवा उद्योग प्रमुख” या पदावर नियुक्ती करताना विशेष आनंद होत असल्याचे नियुक्ती पत्रकात पेशकार म्हणाले.