केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते लेहमध्ये विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी लेह येथील विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी केली. यामध्ये फुटबॉलसाठीच्या खुल्या स्टेडीयममध्ये सिंथेटिक ट्रेक आणि अस्ट्रो टर्फ तसेच एनएसडी बंदिस्त स्टेडीयममध्ये जिम्नाशियाम सभागृहाचाही समावेश आहे.

२०२१ मधील टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टिन लेहमधील विविध ठिकाणी खेळाडूंचा सराव सुरू आहे. लडाखमधील विविध क्रीडा कौशल्यांना शोधन्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यासाठी लेह लडाखमधील विविध क्रीडा पायाभूत सुविधा क्रीडा मंत्रालयाच्या वतीन केल्या जात असल्याच रिजीजू यांनी यावेळी बोलताना सांगितलं.