राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर


मुंबई (वृत्तसंस्था) : एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागानं काल जाहीर केल्या. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

  सर्वोच्च न्यायालयानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र-पीसीबी ग्रुपसाठीची सीईटी परीक्षा एक ते नऊ ऑक्टोबर दरम्यान, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितशास्त्र-पीसीएम ग्रुपसाठीची परिक्षा १२ ते २० ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे.