आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.कोलकाता येथील चित्रकार लावण्या नायडू यांनी हे डूडल साकारलं आहे.

आरती साहा यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून जलतरणाचा सराव सुरू केला आणि १९५८ साली इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या त्या पहिल्या जलतरणपटू ठरल्या. १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ही त्यांनी भाग घेतला होता.