अभिनेत्री रकुलप्रीत सिंह अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-एनसीबीच्या कार्यालयात दाखल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आज सकाळी मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिलेल्या माहितीत रकुलप्रीतचं नाव आल्यानं, एनसीबीने तिला समन बजावलं होतं.