वीज ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी केन्द्रीय उर्जा मंत्रालयाची नियमावली तयार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्रीय उर्जा मंत्रालयाने वीज ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. हा दस्तावेज ३० सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकतींसाठी ग्राहकांकरता खुला आहे.

महानगरांमधे सात दिवसात, महापालिका क्षेत्रात पंधरा दिवसांमधे तर ग्रामीण भागात महिन्याभरात वीज जोडणी देणं, वीजभरणा करण्यासाठी रोख रक्कम, धनादेश तसंच ऑनलाईन सुविधांचा पर्याय यासह अनेक नियमांचा दस्तावेजात अंतर्भाव केला आहे.