जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत अतिरिक्त गाड्या चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबईत अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.


याअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चीम मार्गावर आजपासून ६ सप्टेंबरपर्यंत ४६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील अशी माहिती पश्चिम रेल्वेनं ट्विटरवरून दिली आहे.