माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


मुंबई :- ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार, माजी आमदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनानं ग्रामीण विकासाचा ध्यास असलेलं, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेलं, शेती, सहकाराच्या क्षेत्रातलं तज्ज्ञ, मार्गदर्शक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही राज्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, दहेगावच्या सरपंचपदापासून खासदारकीपर्यंतचा रामकृष्ण बाबा पाटील साहेबांचा प्रवास हा अपार कष्ट, जनसेवेच्या तळमळीचा प्रवास आहे. शेती व सहकाराच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीणविकासावर भर दिला. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी काम केलं. त्यांचं जीवन राजकीय, सामाजिक, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image