उत्स्फूर्त मागणीमुळे देवळाली -मुझफ्फरपूर किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा; उद्‌घाटनापासून लोडिंगपर्यंत चारपट वाढ


लिंक किसान रेल्वे सांगोला-मनमाड-दौंड आठवड्यातून तीनदा


नवी दिल्ली : उत्स्फूर्त मागणीमुळे, येत्या 08-09-2020 पासून देवळाली – मुझफ्फरपूर ही आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या किसान रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करीत ती आता आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे, भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत काल याची महिती देताना, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, मध्यरेल्वे लिंक किसान रेल्वे देखील फेऱ्यांमध्ये वाढ करून सांगोला आणि मनमाड दरम्यान आठवड्यातून दोन वेळा ऐवजी आठवड्यातून तीन वेळा गाडी धावेल जी देवळाली – मुझफ्फरपूर किसान रेल बरोबर मनमाड येथे जोडली जाईल / वेगळी होईल. सविस्तर माहिती खाली आहे :


A.    00107 / 00108  देवळाली – मुझफ्फरपूर – देवळाली किसान रेल (आठवड्यातून तीनवेळा)


रेल्वे क्रमांक 00107 किसान रेल्वे ही 08 - 09 -2020 पासून 25 – 09 – 2020 पर्यंत सध्या प्रमाणेच दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी देवळालीकडे 18.00 वाजता प्रस्थान करेल आणि मुझफ्फरपूर जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी 04.45 वाजता पोहोचेल.


रेल्वे क्रमांक 00108 किसान रेल्वे 10 – 09 – 2020 पासून 27 – 09 – 2020 पर्यंत मुझफ्फरपूर जंक्शन येथून प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवारी 08.00 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी मनमाड येथे 13.00 वाजता पोहोचेल.


थांबा : नाशिक रोड (केवळ 00107 करिता), मनमाड, जळगाव (केवळ 00107 करिता), भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, हारदा, इटारसी, पिपारिया (केवळ 00107 करिता), गदरवाडा (केवळ 00107 करिता), नरसिंहपूर (केवळ 00107 करिता), जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापूर.


रचना : देवळाली येथून रेल्वेला 5 पार्सल व्हॅन लागतील.


B.    00109 /  00110 सांगोला – मनमाड – दौंड (आठवड्यातून तीन वेळा) लिंक किसान रेल


रेल्वे क्रमांक 00109 लिंक किसान रेल 8 – 09 - 2020 पासून 25 – 09 – 2020 पर्यंत दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सांगोला येथून 08.00 वाजता प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी 18.30 वाजता मनमाड येथे पोहोचेल.


रेल्वे क्रमांक 00110 लिंक किसान रेल 11 – 09 – 2020 ते 28 – 09 – 2020 पर्यंत प्रत्येक शुक्रवार, रविवार आणि गुरुवारी 14.00 वाजता मनमाड येथून प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दौंड येथे 18.15 वाजता पोहोचेल.


थांबा : 00109 करिता - पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, बेलवंडी, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव. 00110 करिता – अहमदनगर.


किसान रेलच्या उद्‌घाटनाच्या दिवशी (7-8-2020) 90.92 टन इतका माल चढविण्यात आला, 14 – 08 - 2020 रोजी 99.91 टन, 21 – 8 – 2020 रोजी 235.44 टन माल रेल्वेमध्ये चढविण्यात आला. 25 – 8 – 2020 पासून फेऱ्यांमध्ये वाढ करून त्या आठवड्यातून दोन वेळा करण्यात आल्या, तेव्हा 273.74 टन माल चढविण्यात आला, 28 – 8 – 2020 रोजी 277.64 टन आणि 01 – 09 – 2020 रोजी 354.29 टन माल चढविण्यात आला. आता फेऱ्यांमध्ये आणखी वाढ केल्यानंतर माल वाहून नेण्यामध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे.