देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 47 लाखांवर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 94 हजार 372 नवे कोरोनाग्रस्त आढळल्यानं देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 47 लाखांवर गेली आहे. आरोग्य विभागान जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 37 लाख 2 हजार 595 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 77.88 शतांश टक्क्यांवर गेला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दरही 1.65 शतांश टक्के आहे.

देशातल्या कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता 47 लाख 54 हजार 356 वर गेला असून कोरोनामुळे आतापर्यंत 78 हजार  586 मृत्यु झाले असून गेल्या 24 तासात 1 हजार 114 जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या देशभरात 9 लाख 73 हजार 586 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 5 कोटी 62 लाख60 हजार 928 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. काल एकूण 10 लाख 71 हजार 702 चाचण्या करण्यात आल्या आहेत.