राज्यात आतापर्यंत कोविड-19 चे 7 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी परतले


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-19 चे 13 हजार 489 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आता पर्यंत एकंदर 07 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70 पूर्णांक 2 दशांश टक्के झालं आहे.

राज्यात काल कोविड-19 च्या 22 हजार 84 नवीन रुग्णांचं निदान झालं.त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या दहा लाख ३७ हजार ७६५ झाली आहे. तर 391 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली, त्यामुळे एकंदर मृत्यु संख्या 29 हजार 115 वर पोचली. सध्या राज्याचा मृत्यूदर 2 पूर्णांक 81 शतांश टक्के आहे.