भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती धोकादायक असणाऱ्या 118 मोबाईल अ‍ॅप्सवर सरकारने बंदी घातली


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, तंत्रज्ञान कायद्यातील 69अ, सुधारीत माहिती तंत्रज्ञान (जनतेची माहिती रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय) नियम 2009 नुसार, अधिकारांचा वापर करत धोका लक्षात घेऊन 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सची यादी खाली दिली आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे ते भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाचे संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती पूर्वग्रहदूषीत कृत्यांमध्ये सहभागी झाले होते.


इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरुन वापरकर्त्यांची माहिती चोरुन ती गुप्तपणे भारताबाहेरील सर्व्हर्सना अनधिकृतपणे पुरवण्यात येत असल्याच्या विविध स्रोतांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या आणि अनेक अहवाल प्राप्त झाले होते. 


या आकडेवारीचे संकलन, त्याचे मायनिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या संरक्षणास प्रतिकूल अशा घटकांनी लिहिलेले प्रोफाइल, जे शेवटी भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर अतिक्रमण करणारे आहे, ही अतिशय गंभीर आणि तातडीची बाब असून, त्यासाठी आपत्कालीन उपाययोजना आवश्यक होती.


केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वयन केंद्रानेही या द्वेषयुक्त मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. तसेच, यासंबंधी लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये आणि संसदेबाहेर द्वीपक्षीय चिंता व्यक्त केली होती. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांच्या गोपनीयतेविरोधातील मोबाईल अ‍ॅप्सवर कडक कारवाई करण्याची जनभावना होती.


या आधारे आणि अलीकडील विश्वासार्ह माहिती प्राप्त झाल्यानंतर, घेतलेल्या परवानग्या, तसेच वर नमूद केलेल्या अ‍ॅप्सच्या डेटा हार्वेस्टिंगनूसार, गंभीर बाब व्यक्त करण्यात आली की, हे ॲप्स गोपनीयतेने डेटा संकलित करतात आणि सामायिक करतात आणि वैयक्तिक डेटा आणि माहितीशी तडजोड करतात आणि वापरकर्त्यांची माहिती सामायिक केल्यामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होते.


भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या हितासाठी, भारताचे संरक्षण आणि सुरक्षेसाठी, सार्वभौम अधिकारांचा वापर करत भारत सरकारने मोबाईल आणि गैर-मोबाईल उपकरणांवर वापरल्या जाणाऱ्या या ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची यादी पुढे जोडण्यात आली आहे.


या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीय मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांचे हित जपले जाणार आहे. हा निर्णय भारतीय सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठीचे लक्ष्यित पाऊल आहे.


बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सची यादी:


 




  1. APUS Launcher Pro- Theme, Live Wallpapers, Smart




  2. APUS Launcher -Theme, Call Show, Wallpaper, HideApps




  3. APUS Security -Antivirus, Phone security, Cleaner




  4. APUS Turbo Cleaner 2020- Junk Cleaner, Anti-Virus




  5. APUS Flashlight-Free & Bright




  6. Cut Cut – Cut Out & Photo Background Editor




  7. Baidu




  8. Baidu Express Edition




  9. FaceU - Inspire your Beauty




  10. ShareSave by Xiaomi: Latest gadgets, amazing deals




  11. CamCard - Business Card Reader




  12. CamCard Business




  13. CamCard for Salesforce




  14. CamOCR




  15. InNote




  16. VooV Meeting - Tencent Video Conferencing




  17. Super Clean - Master of Cleaner, Phone Booster




  18. WeChat reading




  19. Government WeChat




  20. Small Q brush




  21. Tencent Weiyun




  22. Pitu




  23. WeChat Work




  24. Cyber Hunter




  25. Cyber Hunter Lite




  26. Knives Out-No rules, just fight!




  27. Super Mecha Champions




  28. LifeAfter




  29. Dawn of Isles




  30. Ludo World-Ludo Superstar




  31. Chess Rush




  32. PUBG MOBILE Nordic Map: Livik




  33. PUBG MOBILE LITE




  34. Rise of Kingdoms: Lost Crusade




  35. Art of Conquest: Dark Horizon




  36. Dank Tanks




  37. Warpath




  38. Game of Sultans




  39. Gallery Vault - Hide Pictures And Videos




  40. Smart AppLock (App Protect)




  41. Message Lock (SMS Lock)-Gallery Vault Developer Team




  42. Hide App-Hide Application Icon




  43. AppLock




  44. AppLock Lite




  45. Dual Space - Multiple Accounts & App Cloner




  46. ZAKZAK Pro - Live chat & video chat online




  47. ZAKZAK LIVE: live-streaming & video chat app




  48. Music - Mp3 Player




  49. Music Player - Audio Player & 10 Bands Equalizer




  50. HD Camera Selfie Beauty Camera




  51. Cleaner - Phone Booster




  52. Web Browser & Fast Explorer




  53. Video Player All Format for Android




  54. Photo Gallery HD & Editor




  55. Photo Gallery & Album




  56. Music Player - Bass Booster - Free Download




  57. HD Camera - Beauty Cam with Filters & Panorama




  58. HD Camera Pro & Selfie Camera




  59. Music Player - MP3 Player & 10 Bands Equalizer




  60. Gallery HD




  61. Web Browser - Fast, Privacy & Light Web Explorer




  62. Web Browser - Secure Explorer




  63. Music player - Audio Player




  64. Video Player - All Format HD Video Player




  65. Lamour Love All Over The World




  66. Amour- video chat & call all over the world.




  67. MV Master - Make Your Status Video & Community




  68. MV Master - Best Video Maker & Photo Video Editor




  69. APUS Message Center-Intelligent management




  70. LivU Meet new people & Video chat with strangers




  71. Carrom Friends : Carrom Board & Pool Game-




  72. Ludo All Star- Play Online Ludo Game & Board Games




  73. Bike Racing : Moto Traffic Rider Bike Racing Games




  74. Rangers Of Oblivion : Online Action MMO RPG Game




  75. Z Camera - Photo Editor, Beauty Selfie, Collage




  76. GO SMS Pro - Messenger, Free Themes, Emoji




  77. U-Dictionary: Oxford Dictionary Free Now Translate




  78. Ulike - Define your selfie in trendy style




  79. Tantan - Date For Real




  80. MICO Chat: New Friends Banaen aur Live Chat karen




  81. Kitty Live - Live Streaming & Video Live Chat




  82. Malay Social Dating App to Date & Meet Singles




  83. Alipay




  84. AlipayHK




  85. Mobile Taobao




  86. Youku




  87. Road of Kings- Endless Glory




  88. Sina News




  89. Netease News




  90. Penguin FM




  91. Murderous Pursuits




  92. Tencent Watchlist (Tencent Technology




  93. Learn Chinese AI-Super Chinese




  94. HUYA LIVE – Game Live Stream




  95. Little Q Album




  96. Fighting Landlords - Free and happy Fighting Landlords




  97. Hi Meitu




  98. Mobile Legends: Pocket




  99. VPN for TikTok




  100. VPN for TikTok




  101. Penguin E-sports Live assistant




  102. Buy Cars-offer everything you need, special offers and low prices




  103. iPick




  104. Beauty Camera Plus - Sweet Camera & Face Selfie




  105. Parallel Space Lite - Dual App




  106. "Chief Almighty: First Thunder BC




  107. MARVEL Super War NetEase Games




  108. AFK Arena




  109. Creative Destruction NetEase Games




  110. Crusaders of Light NetEase Games




  111. Mafia City Yotta Games




  112. Onmyoji NetEase Games




  113. Ride Out Heroes NetEase Games




  114. Yimeng Jianghu-Chu Liuxiang has been fully upgraded




  115. Legend: Rising Empire NetEase Games




  116. Arena of Valor: 5v5 Arena Games




  117. Soul Hunters




  118. Rules of Survival




Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image