देशात २४ तासात सर्वाधिक ७८ हजार ७६१ नवे रुग्ण आढळलेनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचे आतापर्यंत २७ लाख १३ हजार ९३३ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, गेल्या २४ तासात सर्वाधिक ७८ हजार ७६१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातली एकूण रुग्ण संख्या ३५ लाख ४२ हजार ७३३ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.सध्या सात लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्येचं हे प्रमाण २१ पूर्णांक ६० शतांश टक्के आहे. आज सकाळी पर्यंतच्या ९४८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६३ हजार ४९८ झाली आहे. 


देशभरात होत असलेल्या कोरोना चाचण्यांनी आतापर्यंत चार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात गेल्या २४ तासात, ९ लाख २८ हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या असून कोरोनाचाचण्यांची एकूण संख्या आता ४ कोटी ४ लाख ६०९ झाली आहे. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image