विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापनमुंबई (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसींप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.


 उद्याच्या उद्या ही समिती कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. येत्या सोमवारी १२ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षांबाबत पहिला निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.   विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अतिशय सोप्या पद्धतीनं या परीक्षा घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देणार असल्याचंही सामंत यांनी सांगितल. विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल असं कुणीही राजकारण करु नये असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे.


Popular posts
दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा
Image
खाताबुकचे 'पगारखाता' अ‍ॅप
Image
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image