या वर्षी ऑस्ट्रेलियात नियोजित असलेली टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये होणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१ च्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याचा यापूर्वीच मिळालेला हक्क, भारतानं कायम राखला आहे, तर या वर्षी ऑस्ट्रेलियात नियोजित असलेली, पण कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेली टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा, २०२२मध्ये ऑस्ट्रेलियातच होणार आहे. 

न्यूझीलंडमध्ये होणारी महिलांची पन्नास षटकांची विश्वचषक स्पर्धाही, २०२२ च्या फेब्रुवारी- मार्च  पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  कोविड च्या पार्श्वभूमीवर, स्पर्धांच्या बदलाव्या लागणाऱ्या वेळापत्रकांबाबत निर्णय घेण्यासाठी, आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची, काल दुबईत बैठक झाली. या बैठकीत हे सर्व निर्णय झाले.