राज्यात कोविड-१९ संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज- देवेंद्र फडनवीस


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही, असं फडनवीस यांनी नमूद केलं. अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीनंतर समोर येत असलेले खुलासे आश्चर्यकारक असल्याचं फडनवीस म्हणाले.