अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारलीनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यासाठी बिहार राज्य सरकारनं केलेली शिफारस स्विकारली असल्याचं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पटना इथं गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबईत वर्ग करावा यासाठी रिया चर्कवर्ती हीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली.


सुशांत याच्या आत्महत्येविषयीचं सत्य समोर यायला हवं असं मत न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या पीठानं यावेळी नोंदवलं.


Popular posts
दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा
Image
खाताबुकचे 'पगारखाता' अ‍ॅप
Image
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image