राज्यातली मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आज पंढरपुर इथं आंदोलन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरच्या विठ्ठला जवळ सकाळ आंदोलन केलं  आणि  विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असल्याचं म्हटलं होतं. अखेर प्रशासनानं त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली.


आंबेडकर यांच्यासोबत काही मोजक्या जणांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं आंबेडकर म्हणाले. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचंही त्यांनी सांगितलं.


राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


दरम्यान, प्रार्थनास्थळे सुरू केली नाही, तर ९ सप्टेंबरला रिपब्लिकन पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन केलं जाईल असा इशारा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.