आर्मी क्रिडा संस्था, पुणे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020 ने सन्मानित


पुणे : आर्मी क्रिडा संस्था, पुणे या संस्थेचा युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयातर्फे गौरव करून राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020 ने  संस्थेला सन्मानित करण्यात आले.


पार्श्वभूमी


आर्मी क्रिडा संस्थेची उभारणी भारतीय लष्कराच्या मिशन ऑलिंपिक कार्यक्रमाअंतर्गत 01 जुलै 2001 ला झाली. लष्करातील उत्तमोत्तम कौशल्य असलेल्यांना  आर्चरी, ऍथलेटिक्स, मुष्टीयुद्ध, नौकानयन, तिरंदाजी, वेटलिफ्टींग आणि कुस्ती या सात क्रिडा प्रकारातील  प्रशिक्षण देउन ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना तयार करणे हे यामागील उद्दीष्ट.  संस्था लष्करातील खेळाडूंबरोबरच तरुण आणि सिद्ध झालेल्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीज (8-14 वर्षे वयोगट) मधील मुलांनाही खेळाडू प्रशिक्षणासाठी निवडते.


या खेळाडूंना परदेशी, भारतीय प्रशिक्षक, शारीरिक मेहनत करून घेणारे, क्रिडावैद्यकीय तज्ञ, शरिरशास्त्रतज्ञ,मानसोपचारतज्ञ,जीवतंत्रज्ञ, सांख्यिकी-तज्ञ आणि पोषण तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभते.


आर्मी क्रिडा संस्थेत खेळाडूंना सर्वोच मान असुन  लष्कर क्रिडा संस्था त्यांना शिस्त, समर्पणवृत्ती, निर्धार आणि स्वत:ला झोकून देणे या वैशिष्ठ्यांनी घडवत असते. संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे आणि ऑलिंपिक्स, आशियाई क्रिडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा तसेच जागतिक स्पर्धा यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.


उभारणीपासून संस्थेचे 30 खेळाडू ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्यास पात्र ठरले आहेत. टोकियो2021 ऑलिंपिक्ससाठी 12 खेळाडू आधीच पात्र ठरले असून आणखी काही पात्रता फेरी पार करतील. संस्थेने सहा (06) युवक ऑलिंपिक पदके, एकोणीस (19) पदके आशियाई क्रीडास्पर्धेत आणि अठरा (18) पदके राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावली आहेत.


गेल्या तीन वर्षांपासून  आर्मी क्रिडा संस्थेत प्रशिक्षित झालेल्या खेळाडूंनी 450 आंतरराष्ट्रीय आणि 1118 राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. याशिवाय कित्येक प्रथम क्रमांक आणि विक्रमही संस्थेच्या नावावर जमा आहेत. खेलो इंडियाच्या गेल्या तीन सत्रात खेळाडूंनी पाच प्रकारांमध्ये मिळून एकशे पंचवीस (125) पदके मिळवली आहेत.


मानसिकतेला भव्य विचारसरणीसोबतच जबाबदारी, सातत्य आणि ध्येय यांनी उजळवले तर यश साध्य होते.


पंतप्रधान कार्य समितीने देशभरातील अनेक राज्यांमधील अश्या संस्थांची छाननी केली. “कार्य समिती हे न कचरता सांगू शकते की आर्मी क्रिडा संस्था (ASI), पुणे येथे असलेल्या अद्वितिय सोयी, व्यवस्थापन, मनुष्य़बळ या बाबी देशातील इतर कोणत्याही क्रिडासंस्थेपेक्षा वरचढ आहेत. तज्ञ प्रशिक्षकांची सेवा, आर्मी क्रिडा संस्थेतील इतर कर्मचारी   यांना राष्ट्रीय कॅम्प्स आणि स्पर्धांमध्ये सामिल करून घेतले पाहिजे” असे समितीने   एकमुखाने सांगीतले.


संस्थेची शिकवण्याची तत्वे ही क्रिडाक्षेत्राभोवती बांधलेली आहेत. ती वैद्यानिक, व्यक्तीकेंद्रीत, लक्ष्यग्राही, सातत्याने लक्ष देणारी, परिणामकेंद्री, पुढे वाटचाल करणारी, आणि जबाबदारीचे भान देणारी आहेत. ASI टीम ही शिस्तबद्ध, ध्येय्यवादी, निष्ठावान आणि समर्पण दृष्टीकोन बाळगत प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे आणि भव्य कामगिरीचे प्रदर्शन करत देशासाठी विजयीवीर प्रदान करत आहे. 


अधिक माहिती - http://www.armysportsinstitute.com/