व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 14 वे भारत- सिंगापूर संरक्षण धोरण चर्चासत्र


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-सिंगापूर संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्राची (DPD) 14वी फेरी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे पार पडली. यात संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि सिंगापूरचे सचिव (संरक्षण) चान हेंग नी यांनी संयुक्त अध्यक्षपद भुषवले.


यावेळी भारत आणि सिंगापूरमधील अनेक द्विपक्षीय संरक्षण संबधांविषयी द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही देशांमधील संरक्षण संबध वृद्धींगत करण्याबद्दल दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली.


संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्राच्या (DPD)अखेरीस भारत आणि सिंगापूरमध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून सहाय्य आणि आपत्ती दरम्यान सहाय्य (HADR) यासाठीच्या अंमलबजावणीचे व्यवस्थापन यावरही स्वाक्षऱ्या झाल्या.