आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.

जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यकारी गटाची १९८२ मध्ये याच दिवशी जीनिव्हा इथं बैठक झाली होती, तेव्हापासून या दिवशी आदिवासी दिन साजरा केला जातो.