मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावी परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन


मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.


अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन! एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही.


ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, त्यांनी खचून जायची गरज नाही. आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असे नाही आणि एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही. तुम्ही सर्व समृध्द महाराष्ट्राचा कणा आहात. सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!