रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे राज्यभर उपलब्ध करण्यासाठी नियोजन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे राज्यभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

शिंगणे यांनी मुंबईतील काही औषध वितरक आणि रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधांची उपलब्धता, त्यांचे वितरण आणि आकारण्यात येणारी किंमत याबाबत माहिती घेतली, त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या औषधांची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.