राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन सचिन पायलट यांना दूर केलं आहे. याशिवाय विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना या कॅबिनेट मंत्र्यांनाही काढून टाकण्यात आलं आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक आज झाली. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही घोषणा केली.

उपमुख्यमंत्री आणि काही आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडले आहेत, असं ते म्हणाले. गोविंद सिंग दोतसारा नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं त्यांनी जाहीर केलं. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर ज्येष्ठ काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राज भवनावर गेले आहेत.