कोरोनाचा वाढत्या संख्येवर विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्याना पत्र


मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी covid-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा केला. राज्यात रुग्णांची  संख्या वाढत असल्या संदर्भात या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या रुग्णांसाठी सरकारनं खाटा, रूग्णवाहीका, ऑक्सीजन सिलेंडर तसंच व्हेंटिलेटर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना या पत्रात नेत्यांनी केल्या आहेत.

कोविड सेंटर्समथल्या गैरसोयींकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. कोविडमुळे आणि इतर आजारांमुळे झालेल्या मृत्यूची नोंद करण्याच्या मुंबई महानगर पालिकेच्या पद्धतीतही त्यांनी बदल सुचवले. 

उपचारासाठी खाजगी  दवाखाने आकारत असलेल्या भरमसाठ शुल्कासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी अशी विनंती या नेत्यांनी केली आहे.