दूध रस्त्यावर फेकल्यानं प्रश्न निकाली निघत नाहीत : दुग्ध व्यवसाय विकास मंत्री


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूध रस्त्यावर फेकल्यानं प्रश्न निकाली निघत नाहीत, आपलं म्हणणं सरकारसमोर मांडायला हवं. त्यातूनच मार्ग निघेल, असं दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. आज दूध दराबाबत मंत्रालयात बोलवलेल्या बैठकीत आंदोलक आपलं म्हणणं मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दूध दराच्या मुद्दयावर आयोजित बैठकीपूर्वी ते बातीदारांशी बोलत होते. भाजपानं दूध आंदोलन सुरू करण्यापूर्वीच आम्ही ही बैठक बोलावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध दरासंबंधी या बैठकीत चर्चा होईल. दूध संघासह दुधाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांची मतं जाणून घेतल्यानंतर राज्य सरकार पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेणार असल्याचं केदार म्हणाले. दूध दराच्या मागणीबाबत भाजपाकडून आपल्याला कोणतंही निवेदन मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. रस्त्यावर दूध ओतून देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.