UPSC २०१९ उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा येत्या २० ते ३० जुलै दरम्यान


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ सालच्या परीक्षेत व्यक्तिमत्व चाचणी फेरीसाठी निवड झालेल्या उर्वरित उमेदवारांची परीक्षा येत्या २० ते ३० जुलै या काळात आयोजित करणार असल्याचं UPSC नं घोषित केलं आहे. 

कोविड १९ महामारीमुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे आयोगानं ६२३ उमेदवारांची परीक्षा स्थगित केली होती. देशात सध्या पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना केवळ एकदा दोन्ही बाजूच्या विमान प्रवासाचं भाडं दिलं जाईल, असं आयोगानं म्हटलं आहे.