काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत दीड लाख रोपांचं संगोपन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात अकोला वनविभागाच्या काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत तब्बल दीड लाख रोपांचं संगोपन करण्यात आलं आहे. मार्चमध्ये देशात आलेल्या कोरोना महामारीमुळं त्यापूर्वी लावलेल्या रोपांचं संगोपन कसं होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.

यावेळी वनरक्षक, वनकामगार आणि वनपाल यांनी रोपांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली, लॉकडाऊन काळात मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमांचं  पालन करून सर्वांनी काम केलं.

आज ही  रोपवाटिका चांगलीच बहरली असून लवकरच या रोपांचं  विविध ठिकाणी रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वनपाल अनिस चाऊस यांनी दिली.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image