पत्रलेखन पुरस्काराची रक्कम राज्यपालांकडून पोस्टातील कोरोना बाधितांसाठी


मुंबई : डाक विभागातर्फे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या २५००० रुपयांच्या रकमेत, स्वतःच्या वेतनातून आणखी २५००० रुपये जोडून ही रक्कम डाक विभागातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी डाक विभागाला देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले.


महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने ‘ढाई आखर’ स्पर्धेत “प्रिय बापू आप अमर है” या विषयावर ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आंतरदेशीय पत्रलेखन गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राज्यपाल कोश्यारी यांना प्राप्त झाले होते.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image