'यशस्वी' संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा.
• महेश आनंदा लोंढे
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्याची परंपरा पुण्यातील 'यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स' संस्थेने कायम राखली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात सामुहिक योग प्रात्यक्षिके सादर करता येणार नव्हती हे लक्षात घेऊन योग प्रशिक्षिका मनाली देव यांच्या मार्गदर्शनानुसार फेसबुक लाईव्हद्वारे रविवारी सकाळी ७ वाजता याऑनलाईन योग प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
साधारणतः तासभर चाललेल्या या योग वर्गात 'यशस्वी' संस्थेचे पुणे मुख्यालयातील तसेच देशभरातील १२०० कर्मचारी व विद्यार्थीसुद्धा आपापल्या घरातून कुटुंब सदस्यांसमवेत सहभागी झाले होते. यावेळी मनाली देव यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व विषद करत योग प्रात्यक्षिके सादर केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.