मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चौल, बोर्ली, मुरुड येथे भेट देणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.
सकाळी १० वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील, ११ वाजता चौलमधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांचे बोर्ली येथे आणि साडेबारा वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी करून मदतीचे वाटप करण्यात येईल. मुरुड येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. दुपारी ३ वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.