कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत शहरातील आमदारांची बैठक


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना या विषाणुबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत आयुक्त दालनात आज बैठक झाली.


या बैठकीस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे आदी उपस्थित होते.



शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेऊन प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी आमदारांनी तसेच पदाधिकार्‍यांनी आपली मते मांडून शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणणेबाबत सूचना केल्या.



Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image