रायगडात चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची केंद्रीय पथकानं केली पाहणी, सुधारित निकषांनुसार मदत देण्याची पालकमंत्र्यांची मागणी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज केलं.
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विस्थापितांना कायमस्वरूपी निवारा घरे मिळण्यासाठी निकषात बदल करणे आवश्यक असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.परसबागेसाठी विशेष मदतीचे पॅकेज केंद्र शासनाने जाहीर करावं असंही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज नागाव, आक्षी, येथील शेतकर्यांरना भेटून नुकसानीची पाहणी केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.