बरे होणाऱ्या कोविडरुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश इतकं वाढलं असून बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ४१ हजार २९ इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोविड१९ चे ५ हजार ८२३ रुग्ण बरे झाले आहेत.  


गेल्या चोवीस तासांत कोविड१९ चे नवे ९ हजार ९९६ रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या २ लाख ८६ हजार ५७९ इतकी झाली आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. 


गेल्या चोवीस तासांत देशात कोविड चे ३५७ रुग्ण मरण पावले असून मृतांची एकूण संख्या आता ८ हजार १०२ वर पोचली आहे. कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण २ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.  सध्या एकूण १ लाख ३७ हजार ४४८ रुग्ण उपचार घेत आहेत.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image